पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबई येथून एक अपडेट हाती आली असून.२६ नोव्हेंबर २००८ या साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मानवंदना अर्पण केली आहे.दरम्यान आज मंगळवारी मुंबई पोलिस मुख्यालयात मानवंदना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान आज मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान या हल्ल्यात १७५ जण मृत्युमुखी पडले होते. तर ३०० पेक्षा अधिकजण हे गंभीर रित्या जखमी झाले होते.