पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होऊन १४ वी विधानसभा आज बरखास्त झाली आहे. आज मंगळवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे.दरम्यान याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला राजीनामा दिला आहे.दरम्यान राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे कामकाज पहाणार आहेत.