Home Breaking News ‘डोळे बंद करुन कागदपत्रांवर सह्या करणारा मुख्यमंत्री हवा ‘ नाना पटोले

‘डोळे बंद करुन कागदपत्रांवर सह्या करणारा मुख्यमंत्री हवा ‘ नाना पटोले

45
0

पुणे दिनांक २७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक अपडेट हाती आली असून.डोळे बंद करून कागदपत्रा वर सह्या करणारा मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवा आहे.अशी जळजळीत टीका काँग्रेस पक्षाचे नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.दरम्यान महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत असून देखील  मुख्यमंत्रीपदाकरिता तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू आहे.राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का देवेंद्र फडणवीस याविषयी सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर खल सुरू आहे.याच विषयावर चर्चा करताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान सध्या देवेंद्र फडणवीस यांचे‌ पारडं मुख्यमंत्री पदासाठी जड आहे.भाजपला विधानसभेच्या जास्त जागा मिळाल्याने ते मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी तयार नाहीत.तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे.तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा देखील फडणवीस यांनाच पाठिंबा आहे. आज मुंबईत भाजपाचे केंद्रीय नेतृत्वाचे एक शिष्टमंडळ आज दाखल होणार आहे.व नंतरच मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला जाणार आहे.अशी देखील माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleचंदीगड येथील नाईट क्लब बाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली
Next articleविधानसभेत २८८ पैकी ६५% टक्के नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here