पुणे दिनांक २८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दिवाळीच्या कालावधीत लागल्याने मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा रखडलेला दिवाळी बोनस अखेर त्यांच्या खात्यात जमा झाला आहे.दरम्यान बेस्टच्या एकूण २७ हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज गुरुवारी २९ हजार रुपये जमा झाले आहेत.त्यामुळे बेस्टचे कर्मचारी खूश झाले आहेत.व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. दरम्यान दिवाळीपूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला होता.पण रक्कम देण्यात आली नव्हती.दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून बोनसची तब्बल ८० कोटी रुपयांची रक्कम मिळून देखील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कारणा मुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे बोनसचे वितरण रखडले होते.