पुणे दिनांक २९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीच चांगलाच खळ निर्माण झाला आहे.काल गुरुवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी एकनाथ शिंदे .अजित पवार व देवेंद्र फडणवीस तसेच प्रफुल्ल पटेल.यांच्या उपस्थित एक बैठक झाली.सदरच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे १२ मंत्रीपदाची मागणी केली आहे.तसेच गृहमंत्री.नगरविकासमंत्री.पालकमंत्री अशा महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदाची मागणी केली आहे.तसेच विधानपरिषदेचे सभापतीपदाची देखील यावेळी मागणी केली आहे.दरम्यान गृहमंत्रीपद हे शिवसेनेला पाहिजे.तर हेच गृहमंत्रीपद भारतीय जनता पार्टीला देखील आपल्याकडेच पाहिजे आहे.त्यामुळे आता गृहमंत्री पदावरुन देखील भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात आता कलगीतुरा रंगला आहे.दरम्यान या सर्व मागण्यावर सकारात्मक चर्चा झाल्या आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.पण या बैठकीत अमित शाह यांनी कोणत्याही प्रकारचे आश्वासन एकनाथ शिंदे यांना दिले नाही.अशी देखील माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.या करिता तुम्ही महाराष्ट्रातच निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा असे कालच्या बैठकीत सांगण्यात आले आहे.दरम्यान गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा भारतीय जनता पार्टी व स्वतः देवेंद्र फडणवीस हे ठाम असल्याचे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.