Home Breaking News शिवसेनेच्या चार माजी मंत्र्यांना नवीन मंत्रीमंडळात प्रवेश नाही?

शिवसेनेच्या चार माजी मंत्र्यांना नवीन मंत्रीमंडळात प्रवेश नाही?

47
0

पुणे दिनांक ३० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.महायुतीत स्पष्ट बहुमत असतानादेखील सत्तास्थापनेवरुन आता महायुतीत बराच मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवसेनेला गृहखाते देण्यावरून आता मोठ्या प्रमाणावर वादीवाद सुरू झाला आहे.तर शिवसेना देखील गृहखात्यावरच दावा करुन भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वावर एक प्रकारे दबावतंत्र अवलंबले आहे.तर आता राजकीय क्षेत्रांतून विश्र्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार भारतीय जनता पक्ष केवळ गृहमंत्रीच नव्हे तर शिवसेना शिंदे गटातील चार मंत्र्यांना नवीन मंत्रीमंडळात समावेश करुन घेण्यास तयार नाहीत अशी माहिती पुढे येत आहे.यात अब्दुल सत्तार. दीपक केसरकर.तानाजी सावंत.व संजय राठोड.यांचा समावेश आहे.आता या नवीन वादातून पून्हा महायुती मध्ये वांदग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Previous articleजेष्ठ नेते शरद पवार समाजसेवक बाबा आढाव यांच्या भेटीला, भेटी नंतर घेतली पत्रकार परिषद
Next articleभारतीय जनता पक्षाचा गटनेता निवडीसाठी ३ डिसेंबरला मुंबईत बैठक!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here