Home Breaking News काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दरे गावावरुन मुंबईला येण्याची शक्यता

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दरे गावावरुन मुंबईला येण्याची शक्यता

33
0

पुणे दिनांक १ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता हाती सातारा जिल्ह्यांतून एक राजकीय अपडेट हाती आली असून.सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथील दरे गावात मुक्कामास गेलेले महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  आज दुपारी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या दरे गावी मुक्कामसाठी गेले होते. दरम्यान गावी गेल्यावर शनिवारी त्यांची अचानकपणे तब्येत बिघडली होती.त्यामुळे त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक दरे येथील निवासस्थानी दाखल झाले होते.त्यांच्यावर दरे येथील निवासस्थानीच डॉक्टरांनी सलाईन लावून उपचार केले आहे.दरम्यान शिंदे यांना ताप तसेच अशक्तपणा व घशात खवखव असा त्रास होत होता असे समजत आहे.दरम्यान त्यांना भेटायला दीपक केसरकर हे गेले होते पण केसरकर यांना मुख्यमंत्री यांची भेट मिळाली नाही.दरम्यान मुख्यमंत्री आजारी असल्याचे कळताच त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे काल दरे गावी दाखल झाले आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत ठीक आहे. दरम्यान आज रविवारी महायुतीची महत्त्वाची बैठक मुंबईत आहे.त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  दुपारी मुंबईत सदरच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous articleतेलंगणात छत्तीसगढच्या सीमेवर ७ मोवाद्यांचा खात्मा
Next articleमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करुन भाजपचा काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेना मेसेज?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here