Home Breaking News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांचा राजीनामा

42
0

पुणे दिनांक १ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक ठाणे जिल्ह्यातून खळबळजनक अपडेट आली असून.ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर पराभव झाला आहे.दरम्यान ठाणे व पालघर विधानसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकरत अविनाश जाधव यांनी ठाणे व पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एकूण राज्यभरात  १३९ उमेदवार दिले होते.मात्र यातील काही उमेदवारांची अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. व एकही उमेदवार निवडून आला नाही.तसेच यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कल्याण ग्रामीण असलेली जागा देखील त्यांच्या हातातून गेली आहे.

Previous articleपुण्यात शिक्रापूर येथे भरदिवसा माजी उपसरपंचावर धारदार शस्त्राने वार करुन खून एकच खळबळ
Next articleआशिया चषकात भारताने जपानवर २११ धावांनी मिळवला विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here