पुणे दिनांक २ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजधानी दिल्लीतून एक मोठी अपडेट आली असून.संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात सोमवारी दिल्लीकडे मोठ्या संख्येने निघालेल्या मोर्चात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.मात्र त्यांनी तुर्तास दिल्लीत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी सर्व संबंधित जिल्हा प्रशासनाला एक आठवड्याचा वेळ दिला आहे. तसेच आठ दिवसांमध्ये आमच्या मागण्यांवर निर्णय घ्या.असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.सध्या आंदोलक हे दलित प्रेरणास्थळावर थांबणार आहेत.मागण्या मान्य झाल्या नाहीतर सर्व शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत.