पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील घोरपडी वानवडी पोलिस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या रामटेकडी भागात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पूर्वीच्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना ही जामा मस्जिदच्या समोर घडली आहे.त्यामुळे ह्या भागात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान खून झालेल्या युवकाचे नाव यश सुनील घाटे ( वय १७ रा.रामटेकडी पुणे) असे आहे.दरम्यान या खूनप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोन जणांना तातडीने अटक केली आहे.
खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावे १) साहील लतीफ शेख ( वय १८ ) २) ताहीर खलील पठाण ( वय १८ रा.सर्व्हे नंबर ११० रामटेकडी पुणे) अशी आहेत.दरम्यान खूनप्रकरणी मयत यशचा भाऊ प्रज्वल सुनील घाटे यांनी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.दरम्यान सदर घटनेबाबत वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले की.आज मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास यश घाटे.त्याचे मित्र आदित्य चव्हाण.रेहान पठाण.श्रेयस शिंदे.हे सर्वजण जाणार मस्जिद समोरुन काॅलेजला जात असताना साहिल व ताहीर या दोघांनी पुर्वीच्या भांडणाच्या रागातून राग मनात धरून यश घाटे याला कोयत्याने गंभीर रित्या जखमी करुन ठार मारले आहे.सदर घटनेचा पुढील तपास वानवडी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुनीर इनामदार करीत आहेत.