Home Breaking News लाडकी बहीण योजना सुरूच राहणार,२१००रुपये देण्यासाठी लवकर कॅबिनेटमध्ये मंजुरी – मुख्यमंत्री फडणवीस

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार,२१००रुपये देण्यासाठी लवकर कॅबिनेटमध्ये मंजुरी – मुख्यमंत्री फडणवीस

51
0

पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईवरून राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आली आहे ‌, दरम्यान आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या नंतर काही तास होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल अखेर मोठी घोषणा केली आहे.आम्ही लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे.तसेच निवडणूकीत बोलल्या प्रमाणे आता २ हजार १०० रुपये सुध्दा महिलांना देऊ, याबाबत कॅबिनेट मध्ये लवकरच मंजुरी दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम २ हजार १०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते.आता या योजनेत आता १ हजार ५०० रुपये दिले जात आहेत.

Previous articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजच्या कॅबिनेट बैठक पूर्वी पहिला निर्णय रुग्णांला ५ लाखांची मदत मंजूर
Next articleविरोधी पक्षनेता ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांचा – मुख्यमंत्री फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here