पुणे दिनांक ६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ‘ मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य,समता आणि बंधुतेची शिकवण देतो ‘,अशा महान विचारांचा सागर असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आज ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते.या दिवशी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथे एकत्र येतात.बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.महापरिनिर्वाण दिना निमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन.