Home Breaking News उद्या पासून विशेष अधिवेशन;२८८ नवनिर्वाचित आमदारांना दिली जाणार शपथ तयारी पुर्ण

उद्या पासून विशेष अधिवेशन;२८८ नवनिर्वाचित आमदारांना दिली जाणार शपथ तयारी पुर्ण

43
0

पुणे दिनांक ६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.उद्या शनिवार पासून विधानसभे चे विशेष अधिवेशन सुरू होत आहे.यात सर्व म्हणजे २८८ विधानसभा आमदारांना शपथ दिली जाणार आहे.विधानभवनात शपथविधीची सर्व तयारी करण्यात आली आहे.दरम्यान नवीन सरकारचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर आता उद्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीची प्रकिया पार पडणार आहे.उद्यापासून तीन दिवस विशेष अधिवेशन चालणार आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांना आज दुपारी राज्यपाल यांनी शपथ दिली आहे.दरम्यान हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली  उद्यापासून २८८ नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे.सोमवारी हा सर्व शपथविधी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपध झाल्यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येईल दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानभवनात या विशेष अधिवेशनांची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous articleभारतीय जनता पार्टीचे नेते मधुकर पिचड यांचे निधन
Next articleसांगोल्यात शाहजी पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here