पुणे दिनांक ७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी साठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन घेतले जात आहे.दरम्यान आमदारकीची शपथ घेण्यासाठी हंगामी अध्यक्षांकडून काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व नेते आमदार नाना पटोले यांचे नाव पुकारण्यात आले असता ते शपथ घेण्यासाठी आले नाहीत.नाना पटोले यांच्या सह महाविकास आघाडीचे सर्वच नवनिर्वाचित आमदारांनी आमदारांनी शपथ न घेता विधानभवनच्या सभागृहातून आता बाहेर पडले आहेत.ते उद्या शपथ ग्रहण करण्याची शक्यता आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विरोधक ईव्हीएमवर संशय घेत आहे.त्यामुळे ते ईव्हीएमविरोधात आवाज उठवणार आहेत.दरम्यान आजपासून विशेष अधिवेशन सुरू झाले आहे.