पुणे दिनांक ९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईवरून अपडेट आली असून. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले आहे.मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला कमी जागा मिळाल्या आहेत. मात्र आता विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कारण विरोधीपक्षनेते पदासाठी एका पक्षाकडे किमान २९ आमदार असणे आवश्यक आहे.तर सद्य परिस्थितीत उध्दव ठाकरे गटाकडे २० .काॅग्रेस पक्षाकडे १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकके फक्त १० आमदार आहेत.दरम्यान दिल्ली येथे अरविंद केजरीवाल सरकारने भारतीय जनता पार्टीकडे फक्त ३ आमदार एवढे संख्याबळ असतांना दिल्लीत भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षनेते पद दिले होते.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रात राबवतील का? हे आता पाहावे लागेल.