पुणे दिनांक १३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातील वाघोली येथून एक खळबळजनक अपडेट आली असून.एका युवकाने वाघोली येथे दारु पिऊन चक्क रिव्हाॅलवर मधून हवेत गोळीबार केला आहे .दरम्यान या गोळीबारात सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.सदर गोळीबार घटने प्रकरणी पोलिसांनी 👮 एकाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विशाल कोलते असं आहे.
दरम्यान या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की.गुरुवारी संदीप हरगुडे याला रुग्णवाहिकेतून व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून विशालने विरोध केला.दरम्यान यावेळी व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी संदीपला जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसविले.त्यावेळी संतप्त होऊन विशाल यांने त्यांच्या परवानाधारक रिव्हाॅलवर मधून यावेळी हवेत गोळीबार केला.तसेच दगडाने रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या नंतर संदीप याला रुग्णवाहिकेतून उतरविण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी विशाल कोलते याला ताब्यात घेतले आहे.घटनेच्यावेळी विशाल व संदीप दोघांनी मद्यपान केले होते.अशी माहिती पोलिसांना दिली आहे.