पुणे दिनांक १३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक नवीन अपडेट हाती आली असून मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्था पकीय संचालक असणाऱ्या अश्र्विनी भिंडेंची बदली करण्यात आली असून.दरम्यान आता अश्र्विनी भिंडे ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत असणार आहेत.त्यामुळे आता अश्र्विनी भिंडे ह्या रेल मेट्रोतून थेट मंत्रालयात जाणार आहेत.दरम्यान त्यांनी मेट्रोत असताना चोखपणे जबाबदारी पार पाडली होती.त्यामुळे आता मंत्रालयात नवीन जबाबदारी कशा पार पाडतात?हे पहाणे आता म्हत्वाचे ठरणार आहे.दरम्यान या आधी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार ब्रिजेश सिंग पाहत होते.आता त्यांच्या जागी अश्र्विनी भिंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यांची आता मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान या आदेशानंतर त्यांनी त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरम्यान यापूर्वीच पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुन्हा नेमणूक केली आहे.तर आता मंत्रालयात प्रधान सचिव म्हणून अश्र्विनी भिंडे यांची नेमणूक करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण कार्ड एकंदरीत खेळत असल्याचे आता राजकीय वर्तुळातून चर्चा पाहण्यास मिळत आहे.