पुणे दिनांक १४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक अपडेट आली असून.देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.त्यानंतर ते प्रथमच उद्या रविवारी नागपूर येथे जाणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर नागपूरात त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे. ठिक ठिकाणी झेंडे.तसेच भगव्या पताका लावून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.ठिक ठिकाणी रांगोळ्या काढल्या जात आहे.दरम्यान नागपूर विमानतळावरून फडणवीस यांचा धरमपेठ त्रिकोणी पार्क निवासस्थाना प्रर्यत भव्य अशी त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यांच्या निवासस्थाना परिसरात जणू या निमित्ताने देव दिवाळी साजरी होणार आहे.येथे रोषणाई करण्यात आली आहे.दरम्यान उद्या नागपूरात महायुती सरकारचा नवीन मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.तसेच दिनांक १६ डिसेंबर सोमवार पासून एक आठवड्याचे हिवाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे.