Home Breaking News महायुती सरकारला राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरुन विरोधक घेरणार

महायुती सरकारला राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरुन विरोधक घेरणार

33
0

पुणे दिनांक १६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज सोमवार पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारचे आज पहिलेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे.दरम्यान या अधिवेशनात एकूण २० विधेयके मांडण्यात येणार आहे.असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान या अधिवेशनात विरोधक राज्यातील कायदा सुव्यवस्था यात प्रामुख्याने पुण्यातील विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा वाघ यांचे हडपसर येथून भरदिवसा अपहरण व हत्या तसेच बीड येथील सरपंच यांचे अपहरण व हत्या तसेच परभणी मधील हिंसाचार तसेच न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू तसेच आज  आंबेडकर अनुयायांनी पुकारलेला बंद.सोयाबीन कापूस शेतकरी वर्गाचे प्रश्न.तसेच महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात पळवा पळवी.तसेच खास करून ईव्हीएम विरोधातील लढाई.लाडक्या बहीण योजनेचे निकष.विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण.राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगार गिरी तसेच बीड येथील सरपंच हत्या प्रकरणी  अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री धनंजय मुंडेची चौकशी.या सर्व मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Previous articleमहायुतीच्या मंत्रीमंडळात मराठा समाजाचे १७ व कुणबी समाजाचे १७ मंत्री नवीन मंत्रीमंडळात
Next articleआंबेडकर चळवळीतील कार्यकर्तेचा कोठडीत मृत्यू ,अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here