Home Breaking News मुंबई चेंबूरमध्ये आंबेडकर अनुयायींची धरपकड, अनुयायी कडून दिली होती महाराष्ट्र बंदची हाक...

मुंबई चेंबूरमध्ये आंबेडकर अनुयायींची धरपकड, अनुयायी कडून दिली होती महाराष्ट्र बंदची हाक प

46
0

पुणे दिनांक १६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबई मधील चेंबूर येथून येत आहे.आज सोमवारी परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला म्हणून या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकरी अनुयायांनी दिली होती.या प्रकरणी मुंबई मधील चेंबूर येथील आंदोलन कर्ते यांना पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे.

दरम्यान आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला आहे.दरम्यान त्यांच्या मृत्यू प्रकरणी आंबेडकर अनुयायी यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान सुर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.आज दुपारी त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.यावेळी बाळासाहेब आंबेडकर हे अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.सध्या घाटी रुग्णालयाबाहेर  सोमनाथ सुर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.तसेच या ठिकाणी पोलिसांचा देखील कडेकोटपणे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान परभणी झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूर शहरासह बीड व परभणी या ठिकाणी आज बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.दरम्यान  लातूर येथील गंजगोलाई व औसा तसेच मुरुड येथील बाजारपेठा सकाळपासूनच बंद ठेवण्यात आल्या आहेत.एसटी बस व अत्यावश्यक सेवा फक्त सुरू आहेत.

Previous articleआंबेडकर चळवळीतील कार्यकर्तेचा कोठडीत मृत्यू ,अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक
Next articleनाराज छगन भुजबळ विधानभवनात झाले दाखल,’जरांगेंना अंगावर घेतलेचे बक्षीस मिळाले ‘ – भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here