Home Breaking News नाराज छगन भुजबळ विधानभवनात झाले दाखल,’जरांगेंना अंगावर घेतलेचे बक्षीस मिळाले ‘ –...

नाराज छगन भुजबळ विधानभवनात झाले दाखल,’जरांगेंना अंगावर घेतलेचे बक्षीस मिळाले ‘ – भुजबळ

132
0

पुणे दिनांक १६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती नागपूर येथून एक म्हत्वाची अपडेट हाती आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते.अशी चर्चा सुरू आहे.ते काल पासून नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू मध्ये मुक्कामी होते. मात्र आता ते आता अधिवेशनासाठी ते विधानभवनात दाखल झाले आहेत.दरम्यान जेष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्री पद न मिळाल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू आहे.दरम्यान अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी हाॅटेल मध्ये जाऊन भुजबळ यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान काही वर्षांपूर्वी भुजबळ हे विधानभवनात दाखल झाल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांना बोलते केले व तुम्हाला मंत्रीपद का मिळाले नाही .याच्या मागे मराठा आंदोलनचा मुद्दा तुम्हाला भोवला का ? यावर भुजबळ म्हणाले मी ओबीसी समाजासाठी माझी भूमिका होती. ती अन्य समाजाच्या विरोधात नव्हती.पण ‘ मनोज जरांगे पाटील यांना डायरेक्ट अंगावर घेण्याचे आता मला बक्षीस मिळाले आहे ‘ असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.तसेच मला मंत्रीपद का दिले नाही हे पक्षाच्या वरिष्ठांना विचारा असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Previous articleमुंबई चेंबूरमध्ये आंबेडकर अनुयायींची धरपकड, अनुयायी कडून दिली होती महाराष्ट्र बंदची हाक प
Next article‘पोलिसांच्या अमानुषपणे मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here