पुणे दिनांक १६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक नागपूर येथून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून. दरम्यान परभणी येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी 👮 अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती.दरम्यान या मारहाणीत पोलिस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला.सोबत शवविच्छेदनाचा अहवाल जोडत आहे.सोमनाध सुर्यवंशी यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.त्या मुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाने दिला आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी परभणी येथील संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.