पुणे दिनांक १७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राजकीय वर्तुळातून एक बारामती येथून खळबळजनक अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने ते प्रचंड प्रमाणावर नाराज झाले असून त्यांचे समर्थक आता रस्त्यावर उतरले आहेत.दरम्यान जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीचे लोण आता सरळ बारामतीपर्यंत पोहोचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मधील सहयोग सोसायटी समोर आज मंगळवारी सकाळी ११ वाजता ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.
दरम्यान रविवारी झालेल्या मंत्रिमंडळात जेष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न आमिळाल्यामुळे ते नाराज होते.व ते नागपूर येथून थेट नाशिकला गेले.त्यांनी काल पासून सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात देखील हजार झाले नाही. व त्यांनी अजित पवार यांची भेट देखील न घेता थेट नाशिकला निघून गेले.दरम्यान भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ओबीसी समाजाचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.आज नाशिक व येवला येथे देखील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे रस्तावर उतरले आहेत.दरम्यान सोमवारी त्यांनी नागपूर येथे पत्रकारां बरोबर संवाद साधताना भुजबळ म्हणाले होते की. ” जहाँ नहीं चैना,वहा नही रहना” ,असे सुचक वक्तव्य केले आहे.दरम्यान ओबीसी समाजाचे कार्यकर्ते यांनी जालना येथे अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आहे.दरम्यान भुजबळ यांच्या नाराजी चार फटका महायुतीला महापालिका.जिल्हा परिषद. तसेच पंचायत समिती मध्ये मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.दरम्यान नाराज छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार का? वेगळा निर्णय घेणार याकडे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहेत.