Home Breaking News विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी

विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी

65
0

पुणे दिनांक १७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक अपडेट आली असून.विधानसभा सभापती राहूल नार्वेकर यांची निवड झाली आहे.पण विधानपरिषद सभापतीपदाची निवड झालेली नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देखील विधान परिषद अध्यक्षांची निवड करण्यात आली नव्हती. मागील सरकार मध्ये विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे याच पूर्वी देखील काही पाहत होत्या व आता देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये देखील गो-हे याच काम पाहत आहेत.दरम्यान आता विधानपरिषदेच्या सभापती पदाची निवडणूक ही १९ डिसेंबर रोजी होणार आहे.दरम्यान १९ डिसेंबरला दुपारी १२ वाजता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.मागील दोन वर्षांपासून विधानपरिषद सभापतीपदाचे पद रिक्त आहे. दरम्यान नवीन सभापती म्हणून कोणाची वर्णी लावली जाते.तसेच महायुती मधील कोणत्या पक्षाकडे विधानपरिषद सभापती पद जाते तसेच कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous articleछगन भुजबळ नाराजीचे लोण बारामतीत, भुजबळ समर्थक अजित पवारांच्या निवासस्थाना समोर करणार आंदोलन
Next articleबारामतीत नंतर पुण्यात समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here