पुणे दिनांक १७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातून राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ते प्रचंड प्रमाणावर नाराज झाले असून.आज भुजबळ यांच्या कार्यकर्त्यां नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते.त्यानंतर आज पुण्यात देखील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे म्हणून समता परिषद आक्रमक झाली आहे.यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा बॅनर घेऊन काळी वेशभूषा परिधान करून निषेध नोंदवला आहे.छगन भुजबळ यांना जाणिवपूर्वक मंत्रीमंडळातून वगळण्यात आले.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असताना देखील अजित पवार यांनी भुजबळ यांना डावलल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे.