पुणे दिनांक १७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.मंत्रीपद न मिळाल्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे चांगलेच नाराज झाले आहेत.त्यांच्या बरोबर समता परिषदेचे नेते व कार्यकर्ते हे देखील आक्रमक झाले आहेत.दरम्यान उद्या जेष्ठ नेते छगन भुजबळ हे दुपारी १२वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्याच्या नाराजीचे सूर संपूर्ण राज्यभर उमटत आहेत.दरम्यान छगन भुजबळ यांनी आज नाशिक मध्ये आणि येवल्यात आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.त्यानंतर आता उद्या ते आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करणार आहेत त्या मुळे सर्वांचे लक्ष उद्याच्या पत्रकार परिषदेत भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात ? व भुजबळ यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळते का हे आता उद्याच चित्र स्पष्ट होईल