पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट मुंबईमधून आली आहे.मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळ एक प्रवासी बोट उलटली आहे.दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची बोट ही एलिफंटाला जात होती.त्याच दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे.सदरच्या प्रवासी बोटीत एकूण ३० प्रवासी होते.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान सदर दुर्घटना नंतर युद्ध पातळीवर मदत कार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.दरम्यान समुद्रात दोन बोटी मध्ये धडक झाल्याने ही घटना घडली आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान या प्रवासी दुर्घटनेची माहिती मिळताच इतर बोटी मदतीला धावून आले आहेत. दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झाल्या बद्दल प्रथम दर्शनी वृत्त मिळत आहे.