पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती नागपूर येथून एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.आज गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व आमदार नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.दरम्यान आज संघाच्या कार्यालयात आज महायुतीच्या सर्व आमदारांचे बौद्धिक आयोजित करण्यात आले आहे. या साठी संघाने भारतीय जनता पार्टी व सर्व मित्र पक्षांना आमंत्रित केले आहे.आता सर्व आमदार संघ कार्यालयात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे सर्वच आमदार दाखल झाले आहेत.तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान सदरची न्यूज अपलोड करण्यापर्यंत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संघ कार्यालयात दाखल झाले नाही अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.