पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती दिल्लीतून एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून. आज संसदेच्या मुख्य गेट जवळ झालेल्या धक्काबुक्कीच्या आरोपावरुन भारतीय जनता पार्टीने विरोधीपक्षनेते व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्लीतील संसद मार्ग पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.आज सकाळी संसदेच्या परिसरात काॅग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती.याप्रकरणी भाजपने राहुल गांधींवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.दिल्ली पोलिसांनी 👮 त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान भारतीय न्यायिक संहितेचे कलम १०९.११५. ११७.१२५.१३१.व ३५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान काल बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात गुरुवारी सकाळी काॅग्रेस पक्षाच्या वतीने संसदेत निदर्शने करत होती.यावेळी भाजपचे खासदार देखील काॅग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन करत होते.यावेळी धक्का बुक्की झाली.व यात भाजपचे दोन खासदार प्रताप सारंगी व मुकेश रजपूत खाली पडून जखमी झाले आहेत.यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांनीच धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे.