पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.दिल्लीतील संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या संकुलात झालेल्या हाणामारीचा वाद अद्याप देखील सुरूच आहे.दरम्यान या हाणामारीत भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार जखमी झाले आहे.असा दावा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिल्ली येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान याच संदर्भात काॅग्रेस पक्षाच्या वतीने देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी 👮 या दोन्ही तक्रारी दोन गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे.आता या दोन्ही तक्रारीचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस करणार आहेत.