पुणे दिनांक २१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबई वरुन एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.दिनांक १८ डिसेंबर बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या खासगी नीलकमल प्रवासी बोटीला नैदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने अपघात झाला होता. आता या घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे.दरम्यान बोट दुर्घटना नंतर बुडालेल्या मृतांचा शोध अद्याप सुरू आहे.या दुर्घटना मध्ये आतापर्यंत १४ मृत व्यक्तीचा शोध लागला होता.आता पुन्हा नव्याने एक मृतदेह आढळल्याची माहिती समोर येत आहे.आता बोट ⛵ दुर्घटनेचा आकडा १५ वर पोहोचला आहे.दरम्यान या संदर्भात संबंधित अधिकारी यांनी माहिती दिली आहे.