पुणे दिनांक २४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट जम्मू काश्मीर येथून आली असून.जम्मू काश्मीर मधील पुंछ सेक्टर मध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात ५ जवानांना प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवानांना घेऊन जाणारे लष्करी वाहन तब्बल २०० फुट दरीत कोसळून ही दुर्घटना घडली आहे.अपघाता नंतर घटनास्थळी बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.दरम्यान अपघातामधील जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे.तसेच बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.