Home Breaking News महायुतीतच त्यांचे आमदार ‘एक है तो सेफ आहे का ? आज परंडा...

महायुतीतच त्यांचे आमदार ‘एक है तो सेफ आहे का ? आज परंडा बंदची हाक

36
0

पुणे दिनांक २५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक भूम परंडा तालुक्यातून एक अपडेट आली असून.शिवसेनेचे माजी आरोग्य मंत्री व आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.दरम्यान या धमकीचा निषेध म्हणून आज परांडा शहर बंदची हाक देण्यात आली आहे.दरम्यान या बंदचे निवेदन परंडा तहसीलदार यांना आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांकडून देण्यात आले आहे.दरम्यान आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांकडून ठिक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.आमदार तानाजी सावंत यांचे दोन पुतण्यांना तुमचा देखील सरपंच संतोष देशमुख करु ,अशी धमकी एक निनावी पत्राद्वारे दोघांना देण्यात आली आहे.दरम्यान आमदार तानाजी सावंत हे महायुती सरकार मधील शिंदे गटाचे शिवसेनाचे आमदार आहेत.व महायुतीचे एक घोषवाक्य आहे.’ एक है तो सेफ है’ मात्र आता या अज्ञात व्यक्तींनी दिलेले धमकी नंतर महायुतीचेच आमदार महाराष्ट्रात सेफ नाहीत ? असे एकंदरीत चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.

Previous articleआज बुधवार २५ डिसेंबर नाताळ सण
Next articleनैनितालमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू तर २५जण जखमी बचावकार्य सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here