पुणे दिनांक २८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार बीड जिल्ह्यात महायुती सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या बारा वाजल्या आहेत.बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी आज शनिवारी सकाळी १० वाजता महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते व जिल्ह्यातील गावकरी यांचा भव्य असा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील बाजारपेठ. शाळा व महाविद्यालये आज बंद राहणार आहे.तर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.दरम्यान आज वाहतूक व्यवस्थेत देखील मोठ्या प्रमाणावर बदल केला आहे.सर्व वाहतूक देखील शहराच्या बाहेरील मार्गाने वळविण्यात आली आहे.दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन १९ दिवस होऊन देखील खूनप्रकरणी तीन आरोपी फरार झाले आहेत.त्यांना अटक करण्यास महायुती सरकार अपयशी ठरत आहे.याच्या निषेधार्थ आज भव्य मोर्चाचे सर्वपक्षीय नियोजन करण्यात आले आहे.