पुणे दिनांक २९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार असल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगा चे कोणत्याही प्रकारचे नियम पाळले नाहीत.सर्व नियम धाब्यावर बसवून ही निवडणूक घेण्यात आली आहे. असा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच केली आहे.त्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे.दरम्यान ६ जानेवारीच्या आधी सगळ्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे.व त्यानंतर ६ जानेवारी प्रर्यत मुदत याचिका दाखल करण्यात येणार आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.