पुणे दिनांक २९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्रात आता प्राणी देखील सुरक्षित नसल्याचे उदाहरण समोर आले आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.विविव ठिकाणी गोळीबाराच्य घटना घडतांना दिसत आहे.आता अशीच एक घटना मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेतील शांतीवन इमारतीमध्ये एका व्यक्तीने चक्क कुत्र्यावरच गोळीबार केला आहे. दरम्यान या गोळीबारात कुत्र्याच्या शरीरातून गोळी आर-पार झाली आहे.कुत्रा गोळीबारात गंभीर रित्या जखमी झाला असून त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान कुत्र्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे.