Home Breaking News वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सुरू,केज कोर्टाबाहेरील गर्दीवर 👮 पोलिसांचा लाठीचार्ज

वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सुरू,केज कोर्टाबाहेरील गर्दीवर 👮 पोलिसांचा लाठीचार्ज

56
0

पुणे दिनांक ३१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक केज तालुक्यांतून अपडेट हाती आली आहे.२० दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड हा आज दुपारी पुण्यातील पाषाण येथील सीआयडी कार्यालयात सरेंडर झाल्या नंतर पुणे सीआयडीने त्यांचा रितसर ताबा बीड येथील सीआयडीकडे दिला आहे.दरम्यान केज येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. दरम्यान केज येथील कोर्टात त्याला रात्री उशिरा हजर करण्यात येणार आहे.त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान वाल्मिक कराडवर खंडणी आणि मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोप आहे.त्यांने आज पुण्यात सीआयडी कार्यालयात सरेंडर केले आहे.

दरम्यान आता थोड्याच वेळात त्याला केज येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी केज कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.दरम्यान या गर्दीला पांगवण्यासाठी तेथील पोलिसांनी 👮 वाल्मिक कराड यांच्या समर्थकांवर सौम्य असा लाठीचार्ज केला आहे.दरम्याश लाठीचार्ज पूर्वी कोर्टाच्या आवारातील चाच चाकी गाड्या काढण्यास कोर्टातील कर्मचारी यांनी सांगितल्या नंतर त्यांच्या समर्थकांनी कोर्टाच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली होती.दरम्यान आता या गर्दीला पांगवण्यासाठी व आणि तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात कोठे देखील अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी एस‌आरपीएफचा देखील तुकड्या बंदोबस्ता करीता मागविण्यात आल्या आहेत.

Previous articleसरपंच हत्याप्रकरणी धनंजय देशमुख यांची आज पत्रकार परिषद
Next articleवाल्मीक कराडच्या विरोधात केस लढण्यास वकिलांची मनाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here