पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत असताना संबंधित पत्रकार परिषदचे पोलिसांनी 👮 चित्रिकरण केले आहे.दरम्यान आमदार हे महायुती मधील नेत्यांवर नेहमी कडक टीका टिप्पणी करत असतात त्यांच्यावर ठाण्याचे एसीबी पोलिस (गोपनीय विभागाची ) नजर असल्याचे आज समोर आले आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानात थेट पोलिस घुसून त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड घेत असलेल्या पत्रकार परिषदेचे चित्रिकरण केल्या नंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आता चांगलेच आक्रमक झाले असून.विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच पोलिस वाॅच का ठेवतात असा सवाल त्यांनी केला आहे.दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीनीय विभागाचे पोलिस असल्याचे पहायला मिळाले त्यानंतर आव्हाड यांनी पोलिसांना चांगलेच सुनावले.ते म्हणाले पोलिस यांनी आमच्यावर वाॅच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराड याच्यावर वाॅच ठेवावा.दरम्यान माझ्या खासगी निवासस्थानी ही पत्रकार परिषद सुरू असताना पोलिस घुसतात कसे? असा संतप्त होत त्यांनी सवाल केला आहे.