पुणे दिनांक ४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.संभाव्य पालक मंत्र्यांची यादी पोलखोलनामाच्या हाती आली असून.पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागलेली दिसत आहे.तर नुकतीच बीड जिल्ह्या मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे तिथे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करु नये म्हणून अनेक पक्षांच्या आमदारांची मागणी आहे.तर या संभाव्य यादीत बीड जिल्हा पालकमंत्री म्हणून खमक्या अशा अजित पवार यांचेच नाव आहे.
दरम्यान पालक मंत्रीपद संभाव्य असे आहे.१) नागपूर. चंद्रशेखर बावनकुळे २) ठाणे.एकनाथ शिंदे ३) पुणे व बीड.अजित पवार ४) सांगली.शंभुराज देसाई.५) सातारा.शिवेंद्रराजे भोसले.६) छत्रपती संभाजीनगर. संजय शिरसाट व अतुल सावे.७) जळगाव.गुलाबराव पाटील.येथे भाजपचा दावा.८) यवतमाळ.संजय राठोड.९) कोल्हापूर.हसन मुश्रीफ.१०) अहमदनगर. राधाकृष्ण विखे पाटील.११) अकोला.माणिकराव कोकाटे / आकाश फुंडकर.१२) अमरावती.चंद्रकांत पाटील.भंडारा. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्री पद आहे पण नाव घोषित करण्यात आले नाही.