Home Breaking News खासदारांच्या चड्डी संदर्भात वादग्रस्त पोस्ट करणा-या गणेश मुंडेंची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी...

खासदारांच्या चड्डी संदर्भात वादग्रस्त पोस्ट करणा-या गणेश मुंडेंची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

59
0

पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.त्यांनी याबाबत दिल्ली येथील मानव आयोगाकडे तक्रार केली की या हत्याकांड प्रकरणी चौकशी व्हावी. यात दोन पोलिसांची देखील नि: पक्षपणे चौकशी करावी अशी लेखी मागणी केली होती.यात सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे व तसेच सहायक पोलिस निरीक्षक दहिफळे यांची नावे असल्याने गणेश मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर आता त्यांची बीड येथून तातडीने पुणे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.त्यांना खासदार यांच्या बरोबर पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे.

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बीड येथील पत्रकारांसाठी पोलिस अधीक्षक यांनी एक व्हाॅट्स‌अॅप ग्रुप केला आहे.सदरच्या या ग्रुपवर बीड येथील सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांनी वादग्रस्त पोस्ट केली होती की .मी जर पत्रकार परिषद घेतली तर खासदारची चड्डी देखील जागेवर राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.त्यानंतर तातडीने मुंडे यांना या ग्रुप मधून काढून टाकण्यात आले होते.आता मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची तातडीने गंभीर दखल घेत वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांची तातडीने पुणे येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर केलेली वादग्रस्त पोस्ट त्यांना भोवली आहे.दरम्यान मुंडे यांनी केलेल्या वादग्रस्त पोस्ट बाबत आज पुण्यातील मुकमोर्चात  खासदार बजरंग सोनवणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांना चॅलेंज दिले होते.तु आता पत्रकार परिषद घेच.तुमच्या जीथे-जीथे बदल्या झाल्या त्यामागे कोण आहे? येत्या दोन दिवसांत समोर येईल असं त्यांनी म्हटलं होतं.त्यानंतरच तातडीने सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

 

Previous article” आवदा कंपनीच्या खंडणीची डील धनंजय मुंडेंच्या सातपुडा या शासकीय बंगाल्यावर निवडणुकीसाठी ५० लाख दिले ” सुरेश धस यांनी डी.एम.ची पुण्यात केली पोलखोल
Next articleमुंबईतील मंत्र्यांच्या बंगले हे आता खंडणीचे अड्डे? -अंजली दमानिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here