पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबई मधून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या युवकाच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी 👮 आवळल्या आहेत.दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव हितेश प्रकाश धेंडे असं आहे.धेंडेंने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी दिली होती.त्यानंतर काल ठाण्यातील श्रीनगर पोलिस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान धेंडें याला तातडीने अटक करावी या मागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर जमा होऊन आक्रमक झाले होते.