पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी पुण्यातून एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यातील एकूण पाच शिवसेनेचे नगरसेवक हे आज मंगळवारी दुपारी एक वाजता मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत .पक्ष प्रवेश करणा-या शिवसेना नगरसेवकांची नावे १) विशाल धनवडे २) बाळासाहेब ओसवाल ३) संगिता ठोसर ४) पल्लवी जावळे आणि ५) प्राची आल्हाट असे यांची नावे आहेत.दरम्यान हे पाचही नगरसेवक व असंख्य शिवसैनिक आज दुपारी एक वाजता मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष मुंबई चंद्रशेखर बावनकुळे.मंत्री चंद्रकांत दादा पाटील.तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ तसेच भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील सर्व आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय मध्ये हा जाहीर प्रवेश होणार आहे.दरम्यान या शिवसेना पाच नगर सेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला पुण्यात मोठ्या प्रमाणावर खिंडार पडणार आहे.तसेच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीआधीच हा पक्ष प्रवेश होत असल्याने आतापासूनच भारतीय जनता पार्टी ही पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे.दरम्यान आता पुण्यात आणि पिंपरी -चिंचवड मध्ये देखील अनेक इच्छुक आजी माजी नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे एकंदरीत खासगीत बोलले जात आहे.