पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट नेपाळ येथून आली असून.नेपाळ मधील तिबेट सीमेवर आज मंगळवारी झालेल्या विनाशकारी भूकंपात मोठ्या प्रमाणावर जीवीतहाणी झालेली आहे.अशी माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे.यात एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर अनेकजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.येथील अनेक इमारतींना तडे गेले आहेत.तर काही इमारती उध्दवस्त झाल्या आहेत दरम्यान युनायटेड स्टेट्स जिओलाॅजिकल सर्व्हे नुसार नेपाळ मधील आजचा भूकंप ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.दरम्यान नेपाळ येथील भूकंपाचे धक्के भारतात देखील मोठ्या प्रमाणावर जाणवले आहे.