पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील येरवडा येथील एका आयटी कंपनीतील युवतीवर तिच्याच सहका-यानेच पार्किंग मध्ये धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले होते दरम्यान येरवडा येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान सदर युवती शुभदा कोदरे ( वय २८ रा.कराड मृत्यू झाला आहे.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 👮 आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा ( वय ३० रा . शिवाजी नगर पुणे) याला अटक केली आहे.दरम्यान आर्थिक वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.या प्रकरणी पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.