पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक पुण्यातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.पुण्यातील उपनगर वाघोलीत सासू आपल्या घरातच रहात असल्याचा राग आल्याने चक्क जावयाने सासूबाई वर हल्ला केला आहे .तर यावेळी वाचवण्यासाठी आलेल्या मेव्हणीवर देखील 🗡️ चाकूने हल्ला केला आहे.यात सासू व मेव्हणी दोघींजणी जखमी झाल्या आहेत. दरम्यान सासू व मेव्हणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या जावाई यांचे नाव रोशन मंडलिक (वय ३९ रा.वाघोली पुणे) असे आहे.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जावाई रोशन यांला त्यांची सासू आपल्या घरी राहत असल्याचे आवडत नव्हते. त्यामुळे त्यांने सासूबाई हिला आपल्या घरातून निघून जा असे म्हणत वाद घतला.व याच वादातून रागातून त्यांने सासुबाई हिला मारहाण केली.दरम्यान या भांडणामध्ये आईला वाचवण्यासाठी आलेल्या मेव्हणी वर देखील रोशन याने चाकूच्या सहाय्याने हल्ला केला आहे.