Home Breaking News छत्तीसगडमध्ये जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा केला खात्मा

छत्तीसगडमध्ये जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा केला खात्मा

51
0

पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच छत्तीसगढ येथून खळबळजनक एक अपडेट हाती आली असून.छत्तीसगड येथील सुकमा- बीजापूर सीमेवर सुरक्षा दलाला तीन नक्षल वाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.दरम्यान  छत्तीसगड येथे नुकतेच नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सुरक्षा दलाचे वाहन उडवून दिल्याने एकूण ९ जवान या स्फोटात शहीद झाले होते.त्यामुळे आता सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी विशेष शोध मोहीम उघडली असून  या शोधमोहीमेत तेव्हा आमनेसामने आल्यानंतर नक्षल वादी व जवान यांच्यात चकमक झाली आहे.सदरची चकमक चार तास सुरू होती.दरम्यान यात पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे.

Previous articleसाडी नेसलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे आमदार धस यांनी सांगितले नाव
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांना कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरुन फटकारले, तसेच तुम्हाला जमत नसेल तर पद सोडा दुसरा अधिकारी आणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here