पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या इशा-याला येरवड्यात वटाण्याच्या अक्षता,जेल मधून सुटून आलेल्या गुंडांने काढली उघड्या कारमधून रॅली नागरिकांना देखील धमकावले येरवडा पोलिसांचेही तोंडावर बोट
पुणे दिनांक १० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच एक खळबळ जनक अपडेट आली असून.येरवड्यातील घटना आहे. दरम्यान मोक्का कारवाई अंतर्गत येरवडा जेलमधून सुटून आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे हा साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर जेल मधून सुटून बाहेर आल्यानंतर त्याच्या ५० ते ६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कार मधून त्याची भव्य अशी रॅली काढण्यात आली आहे.सदर रॅलीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान वानवडी येथील एका कार्यक्रमात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले होते की. काही लोकांना मस्ती आली असेल तर.त्यांना सक्त ताकीद आहे.बेकायदेशिर धंदे केले.तसेच गॅंग चालवून खंडणी मागितली आणि बळाच्या जोरावर जमीन खाली करण्यास सांगितल्या तर पुणे शहर सोडून जा. नाहीतर तुम्हाला तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ असा सज्जड दम पुण्याचे पोलिस आयुक्त यांनी दिला होता.त्या नंतर फक्त दोनच दिवसात गुंडांने चक्क भव्य रॅली काढून पुणे पोलिस आयुक्तांनाच प्रति आव्हान दिले आहे.असा व्हिडिओच सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.तसेच येरवडा येथील नागरिक यांना देखील धमकावले आहे.येथील नागरिकांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.पण येरवडा पोलिसांनी 👮 तोंडावर बोट ठेवून यात बघ्याची भूमिका घेतली आहे.