पुणे दिनांक १२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील उपनगर न-हे येथे महानगर पालिकेच्या वतीने मोठ्या ड्रेनेज लाईनचे काम बॅक ऑफ महाराष्ट्राच्या पुढील बाजूस मुख्य चौकात काम मागील एक आठड्या पासून सुरू आहे.या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणावर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून ठेवला आहे.हे काम अगदी रस्त्याच्या मधोमध सुरू आहे.त्यामुळे न-हे चौकातून पारे कंपनी व पुढे जाण्यासाठी हाच रस्ता आहे.पण हा रस्ता कामा निमित्ताने बंद केला तरी वाहन चालक याच रस्त्याने धोका पत्करून जात आहे.असाच एक दुचाकीस्वार हा जात असताना तो दुचाकीसह या खड्ड्यात पडला आहे.
दरम्यान या दुर्घटनेत तो किरकोळ जखमी झाला आहे त्याला या खड्ड्यातून अन्य दुचाकीस्वार व स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले आहे.दरम्यान न-हे हा भाग पुणे महापालिकेत वर्ग झाला आहे.दरम्यान विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील या भागातील ड्रेनेज लाईनच्या कामा करिता सुमारे दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.दरम्यान आचारसंहिता मुळे हे काम निवडणूका झाल्या नंतर सुरू करण्यात आले आहे.मात्र या ही ड्रेनेज लाईन रस्त्याच्या मधोमध असल्याने या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.त्यामुळे पारे कंपनीकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हाच रस्ता असल्याने त्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.आणि ठेकेदार हा अगदी कासव गतीने काम करत असल्यामुळे याचा त्रास या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.तसेच सकाळी व संध्याकाळी या भागात रोजच वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होत असते.