पुणे दिनांक १२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती नाशिक येथून एक खळबळ जनक अपडेट आली असून.नाशिक मध्ये एक भीषण असा अपघात झाला असून यात ट्रक आणि पिकअप जिपची जोरात धडक झाली आहे.या भिषण अशा अपघातात एकूण ५ ते ६ जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.दरम्यान सदर घटनेबाबत पोलिस सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील द्वारका उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला आहे.यात अन्य १० ते १२ जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या ट्रकमध्ये लोखंडी सळई घेऊन जात होता तर पिकअप जिप मध्ये भरपूर प्रवासी होते.या भरघाव वेगाने जाणाऱ्या पिकअफ जिपने ट्रकला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.दरम्यान या अपघातात पिकअप जिपचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान सदर अपघातानंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.