पुणे दिनांक १३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवार पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ‘अमृत स्नान ‘ करुन आज महाकुंभ २०२५ ला सुरुवात झाली आहे.दरम्यान भाविकांचा सुरक्षा साठी .एनडीआरएफ पथक व उत्तर प्रदेश पोलिसांचे जल पोलिस विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.दरम्यान जगभरातील नागरिक मोठ्या संख्येने धार्मिक कार्यक्रमासाठी येतात . तसेच मोठ्या प्रमाणावर साधूसंत येतात दरम्यान आज सुरू झालेला हा महाकुंभ मेळावा दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.दरम्यान १८३ देशातील लोक उत्तर प्रदेश येथील महाकुंभात येण्याची शक्यता आहे.